पुण्याची स्थानिक कारागिरी कोणती असे विचारल्यास कुणालाही तांबट आळीच आठवेल. ठोके मारून तयार केल्या जाणाऱ्या तांब्याच्या वस्तू बघण्यासाठी या परिसरात जायलाच हवे. वर्षांनुवर्षे आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या वस्तूंची यादी तांब्याचा गडू, पूजेचा तांब्याचा कलश किंवा फार तर जुने तांब्याचे घंघाळ किंवा पिंप इतपतच असली तरी आता चित्र बदलते आहे. तांबट आळीतील कारागीरांबरोबर काम करणारा आणि तांब्याच्या कारागीरीला एक वेगळा आयाम देणारा पुण्याचा ब्रँड म्हणजे ‘स्टुडिओ कॉपर’

जागतिक स्तरावर तांब्याच्या वस्तू लोकप्रिय होत असताना आपल्याकडेही घरोघरी तांब्याचे ‘टी कोस्टर’, तांब्याचे दिवे किंवा विशिष्ट खाद्यपदार्थ कलात्मकरीत्या मांडण्यासाठी तांब्याच्या चौकोनी किंवा आयताकृती थाळ्या अशा वेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसल्या तर नवल वाटून घ्यायला नको. तांबट आळीतील कारागीरांबरोबर काम करून तांब्यांच्या वस्तूंना असे आधुनिक रूप देऊन समोर आणणारा पुण्यातला एक ब्रँड म्हणजे ‘स्टुडिओ कॉपर’.

job at barc as a researcher research opportunity at barc
नोकरीची संधी : बीएआरसीत संशोधन संधी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Abhinav, Raosaheb Gurav , Raosaheb Gurav passed away, loksatta news, pune,
‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन

रश्मी रानडे या ‘स्टुडिओ कॉपर’च्या संस्थापक आणि प्रमुख डिझायनर आहेत. रश्मी यांचे शिक्षण ‘प्रॉडक्ट डिझायनिंग’मधले. एका डिझायनिंग फर्ममध्ये काम करताना मुंबई वा इतर ठिकाणहून येणाऱ्या पाहुण्यांना रश्मी आवर्जून तांबट आळी पाहण्यासाठी घेऊन जायच्या. तांब्याची भांडी बनवताना बघणे हा पाहुण्यांसाठी एक वेगळाच अनुभव असायचा. एकदा अशाच त्या पाहुण्यांना तांबट आळी दाखवायला घेऊन गेल्या असताना एका तांबे कारागीराने त्यांना ‘नुसते पाहता काय, तुम्हीही काहीतरी करून बघा,’ असे सुचवले. तांब्याच्या भांडय़ांच्या व्यवसायात प्रामुख्याने घरातील वापरासाठी लागणारी भांडी किंवा पूजेची पारंपरिक उपकरणे बनवली जायची. या व्यवसायात खूप वेगवेगळ्या प्रकारची कलात्मक उत्पादने आणता येतील, हे रश्मी यांना जाणवले आणि त्यांनी तो विचार गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. जागतिक स्तरावर तांबे, ब्रास व इतरही धातूची उत्पादने उत्तम खपत होती. त्याच वेळी दुसरीकडे आपल्याकडे तांब्या-पितळेची भांडी महाग आणि देखभालीस अवघड म्हणून रोजच्या वापरातून कमी होत होती. पुण्यातील तांब्याच्या भांडय़ांच्या स्थानिक कलेस आधुनिक आणि जागतिक धाटणीचे रूप देणे शक्य आहे या विचारातून ‘स्टुडिओ कॉपर ’ची संकल्पना आली आणि आजच्या जीवनशैलीत वापरता येतील किंवा भेट देता येतील अशी तांब्याची उत्पादने बनवणे सुरू झाले.

सुरुवातीला ‘कॉपर’ हा एक रोजगार विकसन प्रकल्प होता. ‘फोर्बज फाऊंडेशन’ आणि ‘इंटॅक’ या संस्थांकडून त्यांना अर्थसाहाय्य मिळाले. २०१४ मध्ये रश्मी यांच्यासह चंदा बिहारी, सुदक्षिणा सिन्हा बॅनर्जी आणि सीमंतिनी मिहिर यांनी अधर मीरचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टुडिओ कॉपर’ ही कंपनी सुरू केली. हा प्रकल्प तांबट आळीतील ३०-३५ कारागीरांबरोबर काम करतो. गणपतीपासून दिवाळीपर्यंत तांब्याच्या कलशासारख्या वस्तू किंवा पूजेची उपकरणे यांना मागणी वाढते. लग्नामध्ये किंवा मोठय़ा सणांना हल्ली या वस्तू भेटही दिल्या जातात. अशा वेळी अधिक मागणीमुळे ‘कॉपर’मधील कारागीरांची संख्याही वाढते. असे असले तरी हा ब्रँड वर्षभर तांब्यांच्या वस्तू पुरवतो. आता ‘फाईव्ह एफ वर्ल्ड’ आणि आसिया तेजानी यांचे अर्थसाहाय्य, तसेच गणेश नटराजन व ‘झेन्सार’ यांच्याकडूनही ‘कॉपर’मध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.

‘कॉपर’ने बनवलेल्या उत्पादनांची ‘वॉटर सिरीज’- म्हणजे तांब्याचे जग, ग्लास सर्वात लोकप्रिय ठरले असे रश्मी सांगतात. असे असले तरी तांब्याचे तोरण व बुकमार्क्‍सपासून फुले ठेवण्याचे कलात्मक घंघाळ आणि तांब्याच्या डब्यांपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू त्यांच्या संकेतस्थळावर सापडतात. अर्थात त्यांच्या किमती अधिक आहेत, हेही नमूद करायला हवे. मुळात तांबे हा धातू महाग असतो. कलात्मक वस्तू बनवताना त्यावर विविध प्रक्रिया कराव्या लागतात, तसेच गुणवत्तेसाठी चाचण्या कराव्या लागतात. शिवाय डिझाईन्स सतत अद्ययावत ठेवावी लागतात, त्यामुळे वस्तूंची किंमत वाढते, असे रश्मी सांगतात.

ई-कॉमर्सद्वारे ‘कॉपर’ची विक्री होते. त्यांच्या स्वत:च्या संकेतस्थळाबरोबर आणखी ८-९ संकेतस्थळांवर त्यांच्या वस्तू मिळतात. देशात कुठेही या वस्तू मागणीनुसार पुरवल्या जातात. शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि मध्य आशियातही त्या निर्यात होतात. न्यूयॉर्कमध्ये २०१४ मध्ये ‘एनवाय नाऊ फेअर’मध्ये ‘स्टुडिओ कॉपर’ची उत्पादने ठेवण्यात आली होती. ‘कॉपर’ने इटालियन डिझायनर्सबरोबर युरोपातील ग्राहकांना आवडू शकतील अशी तांब्याची उत्पादनेही बनवली आहेत. पुण्याबरोबर कोकणातील तांबे कारागीरांबरोबरही ‘कॉपर’ काम करते. शिवाय इतरही काही धातूंच्या वस्तू ते बनवतात. राजस्थानात कांस्य धातू कारागीर, उत्तर प्रदेशात तांबे आणि लोखंडी वस्तूंचे कारागीर त्यांचा भाग आहेत. तांबे व झिंकचा ‘अ‍ॅलॉय’ असलेल्या धातूपासून बनवल्या जाणाऱ्या ‘बिदरी’ कलेतील आरसे, छोटे डबे अशा वस्तू त्यांनी आणल्या आहेत.

पुण्याची शान असणाऱ्या तांबे कारागीरीला ‘स्टुडिओ कॉपर’ने एक वेगळा आयाम दिला. तांब्याच्या वस्तू म्हटल्यावर आपल्या मनात येणाऱ्या वस्तूंपेक्षा खूप निराळ्या वस्तू त्यांनी आणल्या आणि पुण्यातील तांब्याची भांडी जागतिक स्तरावर मिळणाऱ्या तांब्याच्या वस्तूंमध्ये स्थान मिळवू लागली.

संपदा सोवनी sampada.sovani@expressindia.com

Story img Loader