वाईनप्रेमींना आता गुलाबाच्या चवीच्या वाईनचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील उद्योजिका जयश्री यादव यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईनची निर्मिती केली आहे. त्यांच्या या संशोधनावर एकस्व अधिकाराची (पेटंट) मोहोर उमटली असून, फुलापासून वाईन निर्मिती करणाऱ्या जयश्री यादव राज्यातील पहिल्या उद्योजिका ठरल्या आहेत.

यादव यांचा गेल्या वीस वर्षांपासून गुलकंद, सरबत आणि गुलाबपाणी अशा उत्पादनांचा उद्योग आहे. पन्नास-शंभर किलो गुलकं द उत्पादनापासून सुरुवात केलेल्या यादव आजघडीला काही टनांमध्ये गुलकं दाचे उत्पादन करतात. सुरुवातीला त्या गुलकंदासाठी शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेत होत्या. मात्र त्यांनी सात एकरांवर स्वत:ची गुलाबाची बागही विकसित केली आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईननिर्मिती करण्याची कल्पना सुचल्यानंतर त्यांनी त्या दृष्टीने संशोधन सुरू केले. वाईन निर्मिती करण्यात यश आल्यानंतर या संशोधनाचे एकस्व अधिकार घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. नुकतेच केंद्र सरकारकडून त्यांना एकस्व अधिकाराचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Muralidhar Mohol
सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेची साखळी मजबूत करण्याची गरज- मुरलीधर मोहोळ
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
MIDC plot for old age home for artists thane news
‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
Ashwini Vaishnaw news in marathi
नवा विदा संरक्षण कायदा नागरिकांना सक्षम करेल…

यादव म्हणाल्या,‘गेल्या दहा-बारा वर्षांपासून गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईननिर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते.  कश्मिरा या माझ्या मुलीने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून वाईन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे तिच्या मदतीने गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईन तयार केली. एकस्व अधिकार मिळण्यासाठी या पूर्वीही एकदा अर्ज केला होता. मात्र त्या वेळी ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. २०१७ पर्यंत राज्यात फळांपासून तयार होणाऱ्या वाईनसाठीच परवानगी होती. मात्र गुलाबापासून वाईन करण्यासाठीचा अर्ज दाखल के ल्यावर नियमात बदल करण्यात आला आहे. आता गुलाबाच्या वाईनला एकस्व अधिकार प्राप्त झाले आहेत. एकस्व अधिकार मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी रश्मी गणेश हिंगमिरे यांनी सहकार्य केले. गुलाबाच्या वाईनचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठीचा परवानाही मिळाला आहे. वाईनच्या उत्पादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच गुलाबाची वाईन बाजारपेठेत दाखल होईल.’

देशी गाईपासून देशी गुलाबापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मूळ भारतीय गुणधर्म असलेल्या उत्पादनांचे महत्त्व प्रकाशात येणे ही आनंदाची बाब आहे. यातून अनेक मूळ भारतीय पदार्थाच्या पुनरुज्जीवनास मदत होऊ शकते, असे एकस्व अधिकार सल्लागार रश्मी हिंगमिरे यांनी सांगितले.

संशोधनाचे वैशिष्टय़..

उद्योजिका जयश्री यादव यांनी या वाईन निर्मितीसाठी बराच काळ संशोधन केले. त्यांच्या मुलीने ऑस्ट्रेलियातून वाईन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ही वाईन तयार केली. देशी वाणाच्या गुलाबांपासून ही वाईन तयार करण्यात आली असून, हे या संशोधनाचे वैशिष्टय़ आहे.

भारतात एकस्व अधिकार घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. असे असताना संशोधन करून त्यातून उद्योग निर्मिती होऊ शकते हे जयश्री यादव यांच्या रूपाने अधोरेखित झाले आहे. आपल्याकडे फळांपासून वाईन निर्मिती करण्यास परवानगी आहे. पण फुलांपासून वाईन निर्मिती करण्यास परवानगी नव्हती. आता यादव यांच्या गुलाबाच्या वाईनसाठी नियमांत बदल करावा लागला.

– रश्मी हिंगमिरे, एकस्व अधिकार सल्लागार

Story img Loader