पुण्यातल्या बिबवेवाडीतल्या क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांवर बाऊन्सर्सनी माराहण केल्याचा आरोप होतोय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या प्रकरणी मंगेश गायकवाड नावाच्या पालकानं तक्रार केल्यानंतर अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी फीसंदर्भात पालकांना बोलावले होते. त्यासाठी पालक शाळेत आले होते. मात्र पालकांचा बाऊन्सरशी वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. व्हिडीओमध्ये महिला बाऊन्सर देखील हात का उगारला अशी विचारणा करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांची आणि शाळेची काय बाजू आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.
शाळेसंदर्भातल्या विविध मागण्यांसाठी हे पालक निवेदन घेऊन गेले होते. त्यावेळी तिथल्या खासगी बाऊन्सर्सने या पालकांना शिवीगाळ करत मारहाण केली असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.