पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आळंदी रस्त्यावर घडली. या प्रकरणी पीएमपी बसचालकाच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : झोपेत असलेल्या पत्नीचा पेटवून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

महेश हरीभाऊ पाटोळे (रा. साई तिरुपती ग्रीन सोसायटी, वडमुखवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सचिन रायनातलू (रा. वडमुखवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार पाटोळे आळंदी रस्त्याने जात होते. आर्मी पब्लिक स्कुलसमोर भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार पाटोळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पीएमपी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक शरद माळी तपास करत आहेत.