‘भारत जोडो’ यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि काँग्रेस आमने – सामने आले आहेत. भाजपने काँग्रेस भवनात जाऊन ‘माफीवीर जवाहरलाल नेहरू’ असे फलक लावत; तसेच राहुल गांधी यांच्या छायाचित्राला काळे फासले. युवक काँग्रेसने सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळा परिसरात ‘माफीवीर’ असे फलक लावले दरम्यान, सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.

याप्रकरणी भाजप आणि काँग्रेसकडून परस्पर विरोधी तक्रार अर्ज पोलिसांकडे देण्यात आले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्याविरोधात भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक परिसरात काँग्रेसविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. सारसबाग येथीलसावरकर यांच्या पुतळा परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह मजकूर लावण्यात आल्याचे समजल्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनाकडे मोर्चा वळविला. काँग्रेस भवन येथे घुसून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भितींवर ‘माफीवीर जवाहरलाल नेहरू’ अशा मजकूर असलेले फलक लावले. काँग्रेस भवनातील राहुल गांधी यांच्या छायाचित्राला काळे फासून निषेध नोंदविला.

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळा परिसरात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी ‘माफीवीर’ असे फलक लावल्याने शहरातील भाजपने आक्रमक भूमिका घेतली. सावरकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळा परिसरात आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.राहुल गांधी यांनी केलेले विधान निषेधार्थ आहे. तसेच आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करून राहुल गांधींचा निषेध करणार असल्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, काँग्रेस भवन येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन भ्याड पद्धतीचे आहे. आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. संबंधितांविरूद्ध पोलिसांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सचिन आडेकर यांनी दिली.

Story img Loader