राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाकडे खासदार गिरीश बापट यांनी पाठ फिरवली. बापट यांच्या अनुपस्थितीची चर्चा यानिमित्ताने सभागृहात रंगली.
खासदार बापट यांची प्रकृती सध्या बरी नसल्याने ते जाहीर कार्यक्रमास उपस्थित रहात नाहीत, असा दावा बापट समर्थकांकडून करण्यात आला.
हेही वाचा >>> पिंपरी : दिवाळी बोनसवरून ‘टाटा’च्या कर्मचाऱ्यांचा पूजेवर बहिष्कार
चंद्रकांत पाटील यांच्याकडे शहराचे नेतृत्व आल्यापासून खासदार बापट नाराज असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. बापट अलीकडे फारसे राजकारणातही सक्रिय नाहीत. मात्र बापट आणि पाटील यांच्यात नेतृत्वावरून कोणतेही मतभेद नाहीत, असे पदाधिका-यांकडून सांगितले जात आहे. जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाला शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ,सुनील कांबळे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
…म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी खुर्ची बदलायला लावली
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा भाजप पुणे शहरच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आगमन होताच, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी इतर मान्यवरांपेक्षा उंच खर्ची ठेवण्यात आली होती. ही खूर्ची पाहून पाटील तात्काळ ही खूर्ची हटवायला लावली. इतरांप्रमाणेच खूर्ची आणायला लावली.