पुणे : उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकाळात राज्यात मोदी सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. महाराष्ट्राची अडीच वर्षे बरबाद केली. महाराष्ट्रात जे काही राजकारण चालले आता त्या बाबत बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरापर्यंत काम करून न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले होते. पण उद्धव ठाकरे ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकले नाहीत. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशनात बावनकुळे बोलत होते. आज सामाजिक आंदोलनाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी परत आणले. पंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीमुळे रोखल्या गेल्या, असेही बावनकुळे बोलत होते.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

हेही वाचा : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन पुण्यात सुरू, अमित शहा यांची उपस्थिती

या पूर्वीचे प्रदेश महाअधिवेशन २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना झाले होते. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले होते. लोकसभा निवडणुकीत मोठी ताकद लावली. विरोधकांच्या राजकारणामुळे जागा कमी झाल्या. पण जनाधार वाढला आहे. नऊ जागा जिंकल्या, १० जागा हरल्या. धुळे, बीड, अमरावती, नगर, उत्तर मुंबई, भंडारा, गोंदिया, भिवंडी अशा जागांवर प्रत्येक बूथवर २५ मते मिळाली असती, तर १९ जागा निवडून आल्या असत्या. निवडणुकीत खूप खोट्या गोष्टींना सामोरे जावे लागले. मोदींचे सरकार आल्यास आरक्षण जाईल, घटना बदलली जाईल असा प्रचार विरोधकांनी केला, तो प्रचार खोडून काढता आला नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Story img Loader