पुणे : महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना गंज पेठेत घडली. याप्रकरणी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरुद्ध खडक पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय ३७), त्याचा भाऊ महेश (वय ३५, दोघे रा. किराड गल्ली, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निर्मल मोतीलाल हरिहर (वय ३६, रा. मंगल क्लब मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?

हेही वाचा…शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते निर्मल हरिहर हे महापालिकेत ठेकेदार आहेत. ते रविवारी (२१ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीस निघाले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाजवळ ते थांबले होते. त्या वेळी हरिहर यांच्या ओळखीतील महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश तेथे आले. गिते यांनी हरिहर यांच्या पोटाला रिव्हॉल्वर लावले. हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणून हरिहर यांना जीवे मारण्याची धमकी दिली,’ असे हरिहर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक आयुक्त खाडे तपास करत आहेत.