पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी एकाला कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून शुक्रवारी अटक केली. पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीचे दोन साथीदार पसार झाले असून, पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी सराइत असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील जबलपूरचा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय २५ वर्षीय आहे. तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी तिन्ही आारोपींनी मद्यप्राशन केले होते. ते लूटमार करण्यासाठी बोपदेव घाटात गेले होते. अटक आरोपी कोंढव्यातील एका पावभाजी स्टाॅलवर काम करतो. तिन्ही आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. तिघांची पार्श्वभूमीवर गुन्हेगारी असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी गुंगारा देण्यासाठी मार्ग बदलला. एका मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी

बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबरच्या रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली होती. सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांना कोणतेही धागेदोर मिळाले नव्हते. बोपदेव घाटमार्गे गेलेल्या मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करून तांत्रिक तपास करण्यात आला होता.

हेही वाचा : ‘एसएमएस’ पाठवण्यासाठी २४ कोटींचा खर्च; राज्य सरकारचा निर्णय वादात

‘आरोपी किरकोळ कामे करून उदरनिर्वाह चालवायचे. लूटमारीचे गुन्हे करण्यासाठीच ते मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे मोबाइल संच बंद केले. घाटात एके ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लूटमार करण्याच्या तयारीत होते. त्या वेळी त्यांनी एकांतात बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पोलिसांना चुकविण्यासाठी पायवाटेचा वापर

तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून उतरले. अर्धा तास ते एके ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे गेले. त्यांनी मुख्य रस्ता टाळून पायवाटेचा वापर केला. सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ते गेले. तेथून ते आडमार्गाने गेले. आरोपींनी या भागात यापूर्वी लुटमारीचे गुन्हे केल्याने त्यांना या भागाची माहिती होती. सीसीटीव्ही कॅमरे कोणत्या भागात आहेत, याचीही त्यांना माहिती होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : चित्रपट धोरण समितीच्या अध्यक्षपदी स्मिता ठाकरे यांची नियुक्ती

आरोपी कसा सापडला?

सासवड येथील आमराई वस्ती परिसरातील पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात संशयित आरोपी आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी या भागातील चित्रीकरण तपासले, तेव्हा एका मद्य विक्री दुकानात पाचजण मद्यप्राशन करत असल्याचे आढळून आले. त्यापैकी एक जण सराइत होता. पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने या प्रकरणतील तीन आरोपींची माहिती दिली. तांत्रिक तपासात एका आरोपीचा वावर बोपदेव घाटात असल्याचे आढळून आले. तांत्रिक तपास, खबऱ्याची माहिती आणि रेखाचित्र तंतोतंत जुळल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

बलात्कार प्रकरणात कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी आरोपींना पकडले. पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. शहर, जिल्ह्यातील टेकड्या, घाट रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, प्रकाशझोत बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री