पुणे : पुणे पुस्तक महोत्सवात चौथा विश्वविक्रम नोंदवला गेला. एकाच पुस्तकातील समान परिच्छेद तीस सेकंदात वाचण्याचा हा विक्रम असून, ११ हजार ४२ नागरिकांनी या विक्रमात सहभाग घेतला. या विक्रमाद्वारे दुसऱ्यांदा चीनचा विक्रम मोडीत काढण्यात आला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात या पूर्वी नोंदवलेल्या तीन विश्वविक्रमांनंतर चौथ्या विश्वविक्रमाची नोंद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, मसापचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. ‘लार्जेस्ट ऑनलाइन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्यूरेशन ऑफ ३० सेकंड’ या संकल्पनेवर विश्वविक्रम नोंद झाल्याचे गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी जाहीर केले.
हेही वाचा – पोषण आहारातील अंड्यांच्या दराच्या निर्णयात बदल? काय आहे नवा निर्णय?
विश्वविक्रमासाठी तांत्रिक सहकार्य केलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आदित्य अभ्यंकर म्हणाले, की विभागातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने एकप्रकारे कार्यप्रशिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी १४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या दृकश्राव्य चित्रफिती तयार करणे, त्यांचे विदा विश्लेषण, छायाचित्र प्रक्रिया, दृकश्राव्य प्रक्रिया याचे शिक्षण मिळाले. या कामासाठी विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक दिले जाणार आहेत.
पुस्तकांच्या वाचनामुळे माणूस घडतो. माणूस घडवण्याची ही प्रक्रिया या पुढेही पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने सुरू राहायला हवी. दिल्ली, जयपूर, कलकत्ता येथील पुस्तक महोत्सवाच्या तोडीचा हा महोत्सव असल्याचे डॉ. ढेरे यांनी नमूद केले.