पुणे : बुधवार पेठेतील भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ रंगारी गणपती मंदिर परिसरातील अरूंद गल्लीत आग लागल्यानंतर परिसरात घबराट उडाली. भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्ट्राॅनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : उद्योगांना पूरक पायाभूत सुविधांची बोंब!

वाड्याच्या परिसरातील एका दुकानाला आग लागली. लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अरुंद गल्लीत बंब पोहचण्यास अडथळा आले. बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune budhwar peth fire breaks out near bhau rangari ganpati temple at old wada pune print news rbk 25 css