पुणे : प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बांधकामांसाठी करणे पुणे महापालिकेने बंधनकारक केले असले, तरी बांधकाम करताना व्यावसायिकांना विविध टप्प्प्यांवर नियमानुसार पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा लागतो आहे. एकूण वापरात पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केवळ ३० ते ३५ टक्के करणेच शक्य आहे. ते पाणीही वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्याचा वापर करणे बांधकाम व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरत आहे.

बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. १० जानेवारी २०२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या सव्वादोन वर्षांत या प्रकारचे पाणी वापरण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता बांधकामे थांबविण्याचा इशारा महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने आतापर्यंत प्रक्रिया केलेले पाणी, त्याचा वापर आणि बांधकाम व्यावसायिकांकडून प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यास होत असलेली टाळाटाळ यांमागील कारणांचा शोध ‘लोकसत्ता’ने घेतला.

vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
tanker driver arrested for supplying contaminated water to society in kharadi
खराडीतील सोसायटीत दूषित पाण्याचापुरवठा करणारा टँकर व्यावसायिक अटकेत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा केल्याचे उघड
Kalyan, Water scarcity of 27 villages, Amrit Yojana,
कल्याण : २७ गावांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य संपणार, अमृत योजनेमुळे २७ गावांमध्ये १०५ दलघमी पाण्याची साठवण
Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी
Nagpur Municipal Corporation Penalty waiver tax collection
नागपूर महापालिकेकडून कर वसुलीसाठी दंड माफी, काय आहे योजना?
nagpur municipal corporation launched ambitious plan to waive 80 percent of late fees on water tax bills
नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात

हेही वाचा…पिंपरी : जमीन मोजणीला विरोध करत तीन महिलांचा पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

बांधकाम करतेवेळी विविध टप्प्यांवर पाण्याचा वापर होतो. बांधकाम जसजसे पूर्णत्वास जाते, तसतसे पाण्याचा वापरही कमी होतो. बांधकामासाठीच्या निकषांनुसार सिमेंटचे बांधकाम करताना सिमेंट, खडी आणि अन्य साहित्य एकत्रित करताना पिण्याचे पाणी वापरावे लागते. त्यानंतर सिमेंटचे बांधकाम उभे राहिल्यानंतर (क्युरिंग) पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. त्यामुळे एकूण बांधकामात पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वाटा ३० ते ३५ टक्के एवढाच राहतो. त्यातून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागते. प्रक्रिया केलेले हे पाणी तातडीने उपलब्ध होईल, याची खात्री नसल्याने अनेकदा पुन्हा पिण्याच्याच पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब काही बांधकाम व्यावसायिकांनी निदर्शनास आणून दिली. महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला.

दहा प्रकल्पांतून सरासरी ४५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया

महापालिकेचे एकूण दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. यातील एका प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यातून सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही, तर नरवीर तानाजीवाडी येथील प्रकल्पाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे त्याचाही फारसा वापर होत नाही. नवीन नायडू, बाणेर, बोपोडी, मुंढवा, खराडी, विठ्ठलवाडी, एरंडवणे, भैरोबानाला या आठ प्रकल्पांतून दिवसाला सरासरी ४५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या सर्व प्रकल्पांची क्षमता यापूर्वी ४७७ दशलक्ष लिटर एवढी होती ती वाढवून ५६७ दशलक्ष लिटर एवढी झाली आहे.

हेही वाचा…पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न

दोन वर्षांत ३१९.४७ दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी

महापालिकेने १० जानेवारी २०२२ पासून प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत महापालिकेने आठ प्रकल्पांतून ३१ हजार ९४७ टँकर्स उपलब्ध करून दिले. दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर, यानुसार आतापर्यंत ३१९.४७ दशलक्ष लिटर पाणी देण्यात आले आहे.

बांधकामासाठीच्या पाण्याचे गणित

साधारपणे ५० सदनिकांच्या बांधकाम प्रकल्पांसाठी सरासरी ५० हजार चौरस फूट जागेवर बांधकाम होते. कोणतेही अडथळे आले नाहीत, तर दीड वर्षात बांधकाम पूर्ण होते. त्यानुसार दहा हजार लिटर क्षमतेचे महिन्याला दहा टँकर म्हणजे एक लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते. दीड वर्षासाठी ही मागणी १८ लाख लिटर एवढी होते. बांधकाम प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना पाण्याची मागणी कमी होते. त्यामुळे बांधकामांसाठी साधारणपणे १८ लाख लिटर पाण्यापैकी केवळ १२ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते.

हेही वाचा…मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

अडचणी काय?

प्रक्रिया केलेल्या पाण्याला वास येणे
प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे खर्चीक

पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वेळेवर उपलब्ध होईल याची हमी नसणे
प्रक्रिया केलेल्या पाण्यामुळे मजुरांच्या आरोग्याचे प्रश्न

हेही वाचा…मावळमध्ये किती मतदान केंद्र संवेदनशील?

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर ज्या टप्प्यावर आवश्यक असतो, त्या टप्प्यावर पाणी मिळण्याची हमी महापालिकेकडून मिळाल्यास बांधकाम व्यावसायिक नक्कीच या पाण्याचा वापर करतील. यासंदर्भात महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांबरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा.– संजय देशपांडे, स्थापत्य अभियंता

Story img Loader