आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॅनियल कूपर, अलेक्झांडर हुडहेड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: पत्नीने दिला त्रास, पतीने घेतला गळफास

या बाबत एका व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक वडगाव शेरी भागात राहायला आहे. आरोपींनी व्यावसायिकाला इ-मेल पाठविला होता. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष इ-मेलद्वारे दाखविण्यात आले होते. आरोपींनी व्यावसायिकाच्या मोबाइलवर संपर्क साधून त्याला आभासी चलन गुंतवणूक योजनेची माहिती देऊन जाळ्यात ओढले. त्यानंतर व्यावसायिकाने वेळोवेळी एक कोटी १२ लाख ६० हजार रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केले. पैसे स्विकारल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune businessman duped of rs 1 crore in crypto fraud pune print news rbk 25 zws
Show comments