पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या व्यावसायिकाबरोबर एक विचित्र घटना घडली आहे. संबंधित व्यावसायिक आपल्या फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलवर भेटायला गेले होते. पण हॉटेलमध्ये गेल्यावर दोन अज्ञात पुरुषांनी त्यांना पकडलं. आपण सायबर पोलीस असल्याचं भासवून आरोपींनी पीडित व्यावसायिकाला ५३ हजार ५०० रुपयांना लुटलं आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

फसवणूक करणाऱ्या आरोपींनी फेसबुकवर महिलेच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केलं होतं. संबंधित बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यावसायिकाशी मैत्री केली. तसेच त्यांना भेटायला वारजे परिसरातील एका हॉटेलवर बोलावलं. ४६ वर्षीय व्यावसायिक फेसबुकवरील मैत्रिणीला भेटण्यासाठी संबंधित हॉटेलमध्ये गेले. पण तिथे महिलेऐवजी दोन पुरुष होते. संबंधित दोघांनी सायबर पोलीस असल्याचं भासवलं आणि पीडित व्यावसायिकाला ५३ हजार ५०० रुपयांना गंडा घातला.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपींनी ‘मनीषा जी’ नावाने फेसबूक खातं तयार केलं होतं. त्याचं खात्याचा वापर करून ते पीडित व्यावसायिकाच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांनी एकेदिवशी तक्रारदाराला पुण्यातील वारजे परिसरातील हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. १६ ऑगस्ट रोजी तक्रारदार फेसबुकवरील कथित मैत्रीण ‘मनीषा जी’ यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले.

हेही वाचा- मुंबईत बड्या उद्योगपतीकडून अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, गुन्हा दाखल

परंतु, हॉटेलमध्ये गेल्यावर दोन जणांनी सायबर पोलीस असल्याचं भासवत पीडित व्यावसायिकाला पकडलं आणि तुम्ही महिलेला फसवलं आहे, असा आरोप केला. तसेच महिलांचे व्हिडीओ आणि फोटो काढले आहेत की नाही? हे तपासायचं असल्याचं सांगत त्यांनी तक्रारदाराला त्यांच्याबरोबर येण्यास सांगितलं. यानंतर दोन्ही आरोपींनी पीडित व्यावसायिकाला वारजे येथील एटीएममधून ५३ हजार ५०० रुपये काढण्यास भाग पाडलं आणि पैसे हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम ३९२, ४२०, ५०६, १७०, ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.