कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली आहे. नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली असीम, ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तसेच नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार संपल्यानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.