पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हींसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक, ज्येष्ठ नेते यांच्या जोरदार सभा सुरू आहेत. दरम्यान, काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपा-शिंदे सरकारवर निशाणा साधला. तसेच एमपीएससीबाबत केलेल्या विधानावरून अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

हेही वाचा- “मोदीनॉमिक्सचा ढोल वाजवणारा सत्ताधारी पक्ष अन्…” महागाईवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

काय म्हणाले अजित पवार?

मी अनेक वर्ष पिंपरी चिंचवडचा पालकमंत्री होतो. या शहरात आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामं केली. अनेकदा मी सकाळी ६ वाजता सगळे झोपत असताना आयुक्तांना घेऊन फिरत होतो. कुठं पाणी आलं पाहिजे, कुठं उड्डाण पूल पाहिजे, याची माहिती घेत होते. मी नुसता उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत. आता बाहेरची लोकं येऊन इथे रॅली काढत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रॅली काढावी, इतकी वाईट अवस्था त्यांची झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते आणि निघून जायचं असतं. विशेष म्हणजे रॅली काढली कुठं? तर जिथं मी आदल्या दिवशी रॅली काढली तिथंच यांनी रॅली काढली, अशी टीका अजित पवार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटली

मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटली. मुख्यमंत्र्यांना याआधी आश्वासनांची पूर्ती करू नका असे कोणी सांगितलं होतं? आज पुण्यात झोपडपट्टी, एसआरए आणि अनाधिकृत बांधकामासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मेट्रोचा प्रकल्प आम्ही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर केला. मात्र, काही जण म्हणतात, आम्ही दिल्लीला गेलो, तिथे मेट्रो बघितली म्हणून इथं मेट्रो आणली. कुठं तरी खरं बोला, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी माध्यमाशी बोलताना एमपीएससीचा उल्लेख निवडणूक आयोग असा केला होता, त्यावरून अजित पवारांनी त्यांना खोचक टोला लगावला. एकीकडे एमपीएससीचे मुलं उपोषणाला बसत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री टीव्हीवर सांगतात की निवडणूक आयोगाला आम्ही सांगू. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मी हे मुद्दाम बोलत नाही. यापूर्वीही अनेकदा अशा गोष्टी झाल्या आहेत. सारखं निवडणूक आयोग… निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगाने यांचं काम केलं तर तिकडेच त्यांची मिळती जुळती सुरू आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

हेही वाचा – “संजय राऊतांनी माझ्यासमोर दोघांना अश्लील…”, रामदास कदमांचा हल्लाबोल!

बेरोजगारीवरून शिंदे सरकारवर टीकास्र

आज बेरोजगारी वाढली आहे. आपल्या चाकणमध्ये एक मोठा प्रकल्प येणार होता. दीड ते दोन लाख मुलं त्या कारखान्यात कामाला लागली असती. मात्र, तो प्रकल्प गुजरातला गेला. यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय करत होते? यावर दोघंही बोलायला तयार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.