Pune Porsche Crash Latest Updates: पुणे पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. आता या प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पवयीन मुलाच्या आईला अटक

अल्पवयीन मुलाने पोर्श बेदरकारपणे चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. यानंतर या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला १५ तासांत जामीन मिळाला. यावरुन समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे.

हे पण वाचा- Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

काय चौकशी केली जाण्याची शक्यता?

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली. त्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते त्याची आई शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा कलंक कुणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस त्यांना चौकशीदरम्यान विचारु शकतात. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अपघातानंतर तीन दिवसांनी रॅप साँग गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि ढसाढसा रडत रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगितलं होतं. त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या.

रविवारी नेमकी काय घटना घडली?

१७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनिश आणि अश्विनी या दोघांच्याही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.