पुणे पोर्श अपघात प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून हे प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीदेखील स्थापन करण्यात आहे. यादरम्यान आता ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांवरदेखील कारवाई करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यावर कारवाई करत त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या जागी बारामतीतील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा – Porsche Accident:”पोर्श प्रकरणात आमदाराच्या मुलाचा समावेश, पब पार्टीनंतर रेस..”, नाना पटोलेंचा आरोप

ससूनच्या दोन डॉक्टरांवर कारवाई

दरम्यान, यापूर्वी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी एका डॉक्टरने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेतल्याचाही प्रकार समोर आलं आहे.

बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाचीही होणार चौकशी

महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांचा निंबंध लिहिण्याची शिक्षा सुनावणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाचीदेखील चौकशी होणार असल्याचे पुढं आलं आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नरनावरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “मला बाल न्याय कायद्यांतर्गत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांच्या एकूण वर्तनाची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्याच्या आदेशाच्या संदर्भात सदस्यांची चौकशी करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे”, असं नरनावरे म्हणाले.

हेही वाचा – Pune Porsche Crash : “डॉ. अजय तावरेंच्या जीवाला धोका”, सुषमा अंधारेंनी आर्यन खान प्रकरणाचा हवाला देत म्हटले…

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला होता. एका वेगवान पोर्श कारने दुचाकीवरील दोघांना उडवलं. ही पोर्श कार एक अल्पवयीन चालक चालवत होता. तसंच, तो मद्यधुंद अवस्थेतही होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी आता अल्पवयीन आरोपी तसेच त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune car accident sassoon hospital dean dr vinayak kale sent on leave spb