पुणे : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची संधी देण्याच्या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले होते. विद्यापीठाने त्यावर निर्णय घेत विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय या अभ्यासक्रमाच्या सर्वच प्रथम आणि द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्याशाखांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कसब्याच्या पराभवाचा भाजपने घेतला धसका, पुण्यात बैठकांचा सपाटा; पुढील आठवड्यात रा. स्व. संघाची महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी घेतलेल्या कॅरी ऑनच्या निर्णयाच्या धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी एनएसयूआयसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या बैठकीत चर्चा करून उन्हाळी सत्र २०२३ परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये विशेष प्रवेश संधी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी : चक्क घराच्या दारासमोरच लावली गांजाची झाडे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रासाठी किंवा जेथे लागू असेल तेथे द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षाच्या सहाव्या सत्राला तात्पुरता प्रवेश काही अटींच्या अधीन दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्याकडून हमीपत्र लिहून घेणे अनिवार्य असेल. तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रामध्ये किंवा चौथ्या वर्षाच्या सातव्या सत्रामध्ये तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी त्यात अध्ययन, प्रात्यक्षिके, सत्रकर्म, क्षेत्रभेट आणि इतर बाबी महाविद्यालयाने नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करून घेणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर परीक्षा आणि इतर बाबी या हिवाळी २०२३ (ऑक्टोबर) परीक्षेमध्ये अनुशेषाने विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय-चौथ्या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र ठरतील, अशाच विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी प्रवेश सुरू ठेवता येईल.

हेही वाचा : पुणे : पहिल्या बीआरटी मार्गाचे अस्तित्व संपुष्टात? सोलापूर रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकाच हातोडा घालणार

तर, पाचव्या-सहाव्या, सातव्या-आठव्या सत्र समाप्तीच्या लेखी परीक्षा संबंधित विद्यार्थ्यांना एकत्रित अर्थात उन्हाळी २०२४ च्या परीक्षांमध्ये देता येतील. विशेष परीक्षेची संधी घेऊन तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाचे अनुशेष पूर्ण न केल्यास प्रचलित नियमानुसार तृतीय आणि चौथ्या वर्षाच्या पाचव्या सातव्या सत्राला संबंधित विद्यार्थी अपात्र ठरतील. संबंधित विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश आपोआप रद्द होऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे जमा केलेले शैक्षणिक शुल्क आणि इतर बाबी यांचा परतावा लागू राहणार नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune carry on opportunity given to engineering students of savitribai phule pune university pune print news ccp 14 css
Show comments