पुणे : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी खासगी शिकवणी चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सादीक महंमद बिडीवाले (वय ३८, रा. श्रावस्तीनगर, घोरपडी) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी बिडीवाले हा घोरपडीतील श्रावस्तीनगर परिसरात शिकवणी चालवतो. त्याच्या शिकवणीचे नाव एस. एस. क्लासेस आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी त्याच्याकडे शिकवणीला जाते. महिनाभरापासून बिडीवाले पीडित मुलीशी अश्लील वर्तन करत होता.

हेही वाचा…पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

सोमवारी (२६ ऑगस्ट) बिडीवालेने मुलीची परीक्षा घेण्याच्या बहाण्याने तिला शिकवणीत थांबविले. परीक्षा घेण्याच्या बहाण्याने त्याने अश्लील कृत्य केले. मुलीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. बिडीवालेविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

Story img Loader