गणेशोत्सवाच्या सुरुवातीला राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आह. प्रामुख्याने दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : सरदार मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सव  ; वल्लभेष गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना

राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक भागांत हलक्या पावसाची हजेरी आहे. बहुतांश ठिकाणी आकाशाची स्थिती निरभ्र असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. अनेक भागांत महिन्याच्या सुरुवातीपासून २५ ते २७ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले कमाल तापमान सध्या ३० अंशांवर गेले आहे. सध्या देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये त्याचप्रमाणे इशान्येकडील राज्यामध्ये पाऊस जोर धरतो आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातही काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत पावसाचा अंदाज आहे.

पाऊस कोणत्या भागांत
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत विजांंचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, पालघर जिल्ह्यातही हलका पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतही याच कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.