राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात मुसळधारांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारी राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
दक्षिण कर्नाटक भागात चक्रिय स्थिती, छत्तीसगड ते दक्षिण कर्नाटक दक्षिण कर्नाटक पार करून द्रोणीय स्थिती कार्यरत आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात मध्यपूर्व भागात द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. त्याचे रूपांतर ४८ तासात कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या तिन्ही स्थितीमुळे देशाच्या काही भागासह राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून राज्याच्या सर्वच भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी: सांगवीत सातव्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप

दरम्यान, बुधवार ते शनिवार या कालावधीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे (काही भागांत मुसळधार), कोल्हापूर (घाट भागांत मुसळधार), सातारा (काही भागांत मुसळधार), औरंगाबाद, बुलढाणा आणि गडचिरोली, बुधवारी आणि गुरुवारी सांगली, सोलापूर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत, बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर (काही भागात मुसळधार), गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत, गुरुवारी आणि शुक्रवारी परभणी, शुक्रवारी आणि शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader