नारायणगाव : किल्ले शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती किल्ले शिवनेरी शिवजयंती महाउत्सव समितीचे निमंत्रक तथा आमदार शरद सोनवणे यांनी दिली . दरम्यान , यंदाच्या वर्षी शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्राची आवश्यकता भासणार नाही. सर्व शिवभक्तांना विनापास किल्ल्यावर प्रवेश देण्यात येईल , अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
जुन्नर येथे पत्रकार परीषदेत आमदार शरद सोनवणे यांनी शिवजयंती सोहळ्याची माहिती दिली . या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, सुरज वाजगे, शिवसेना शहर प्रमुख अविनाश करडीले, माजी नगरसेवक शाम खोत , विक्रम परदेशी , संध्याताई भगत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सोनवणे म्हणाले कि, पारंपरीक शिवजन्म सोहळा व छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पथकांना निमंत्रित करण्यात येणार आहे . सायंकाळी ५ वाजता पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती संपन्न होणार आहे.
शिवजयंती निमित्त जुन्नर शहरातील परदेशपुरा चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे उभारण्यात येणारे छत्रपती अंबारी त्रिमितीय प्रवेशद्वार तसेच शिवकालीन शौर्य मावळा प्रवेशद्वार यावर्षीच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे . या ठिकाणी लेझर अँड लाईट शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे
दिनांक १८फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता “शिवनेरकेसरी २०२५” राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देखील प्रथम क्रमांकासाठी १ लाख द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये , तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार तसेच इतर २० रोख पारीतोषिक तसेच चांदीची गदा देण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता शाहीर गणेश वडगावकर यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री बारा वाजता आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना मानवंदना, महाआरती व फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १९ रोजी किल्ले शिवनेरीवरील प्रमुख शिवजन्म सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अजित पवार ,पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ,सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पारंपरीक शिवजन्म सोहळा व छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करनाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख पथकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती संपन्न होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री सात वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत , प्रसिद्ध गायक प्रसन्नजीत कोसंबी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आ. शरद सोनवणे म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अजित पवार यांचे उपस्थित सन १९६० सालापासून प्रलंबित असलेल्या जुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटाच्या प्रश्नाला गती देण्याची मागणी, शिवनेरी किल्ल्यावरील रोपवे मार्ग, जुन्नर तालुक्यातून खेतेपठार तसेच बोरघर मार्गे भीमाशंकरला जोडणारा रस्ता, आंबेगव्हाण येथील बिबट सफारी पार्क , जुन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर सीएसआर फंडातून पाच महाद्वार उभे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले.