पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाज दुखावला गेला होता. तसंच, महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. त्यांनी विविध ठिकाणी आंदोलनं केली.

Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई

शनिवारी चंद्रकांत पाटील दौऱ्यावर असताना विविध संघटनांनी त्यांना विरोध दर्शविला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे पदाधिकाऱ्यांच्या घरातून चहा घेऊन परत येत असताना त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.