शहर आणि उपनगरांत शनिवारी दुपारीनंतर अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या पूर्व भागातील हडपसर, महंमदवाडी, वानवडी या भागात वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे सुमारे १५ ते २० ठिकाणी झाड पडणे, फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. एनआयबीएम रस्त्यावर फांदी पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. शुक्रवारपर्यंत (२४ मे) शहरात अवकाळी पावसाचा मुक्काम कायम असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई, मेाशीनंतर पुण्यातही होर्डिंग कोसळले; बँड पथकातील घोडा जखमी

शहर आणि परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुपारपर्यंत कडक ऊन आणि दुपारनंतर एकदम आभाळ भरून येऊन अवकाळी पाऊस होत आहे. शुक्रवारी देखील शहराच्या मध्यवर्ती भागासह हडपसर भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. शनिवारी सकाळपासून शहरात तीव्र उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे पुणेकर चांगलेच घामाघूम होत होते. दुपारनंतर वातावरणात चांगलाच बदल झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाला सुरूवात झाली. साधारणपणे एक ते दीड तास हडपसर, वानवडी, महमंदवाडी, कोंढवा, कात्रज, एनआयबीएम रस्ता या भागासह मगरपट्टा, कोरेगाव पार्क या भागात पावसाचा जोर जास्त होता. एनआयबीएम रस्त्यावर झाडाची फांदी पडल्याने पडल्याने वाहनाचे नुकसान झाले, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार-शुक्रवारपर्यंत शहरात दुपारनंतर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

शहरात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हडपसर १३

बारामती ३

एनडीए २

लवासा १ कोरेगाव पार्क ०.५

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city and suburbs lashed by sudden unseasonal rain incidents of tree fall at 15 to 20 location pune print news psg 17 zws