लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहर भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून कार्यकारिणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

शहर कार्यकारिणीत १८ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, १८ चिटणीस यासह युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, ओबीसी मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष आणि व्यापारी आघाडी अध्यक्ष अशी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पिंपरी भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर, ‘यांना’ मिळाली संधी

उपाध्यक्षपदी विश्वास ननावरे, प्रशांत हरसुले, मंजुषा नागपुरे, जीवन जाधव, सुनिल पांडे, श्याम देशपांडे, प्रमोद कोंढरे, अरुण राजवाडे, तुषार पाटील, स्वरदा बापट, योगेश बाचल, भूषण तुपे, संतोष खांडवे, महेंद्र गलांडे, रूपाली धावडे, हरिदास चरवड, गणेश कळमकर, प्रतीक देसर्डा यांची निवड करण्यात आली आहे. वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, रवी साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चिटणीसपदी कुलदीप साळवेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांडवे, प्रवीण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुश्यंत मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी वाचा-गणेश मंडळांच्या परिसरातील स्वच्छता, रस्ते दुरूस्तींची पाहणी; कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केल्या ‘या’ सूचना

युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ, महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षदा फरांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नामदेव माळवदे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमराव साठे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इम्तियाज मोमीन आणि व्यापारी आघाडी अध्यक्ष म्हणून उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही माजी नगरसेवकांना ही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune city bjp executive announced girish bapat daughter in law swarda bapat in the executive committee pune print news apk 13 mrj