पुणे : पुणे शहरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला. सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. पुणे शहरात दोन तासात १०५ मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून , संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. यावर पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार ; नागरिकांत धडकी
आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले की, पुणे शहरात काल रात्री १०.३० ते १२.३० या वेळेत १०५ मिमी एवढा पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे १८ वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तसेच दोन ठिकाणी भिंती पडल्या असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शहरातील ड्रेनेज लाईनची क्षमता ६० मिमी आहे. आणि काल त्यापेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले.
पाहा व्हिडीओ –
१८८२ नंतर पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यात परतीचा २१० मिमी इतका पाऊस होयचा. दरवर्षी पुणे शहरात साधारणतः ७०० मिमी पाऊस होतो. मात्र यावर्षी १००० मिमी इतका पाऊस झाला आहे. तसेच आज पुणे शहराला यलो अलर्ट देण्यात आला असून , संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.