दुचाकींचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीस जात असून, गेल्या वर्षी शहरातून दुचाकी, तीनचाकी वाहने, मोटारी अशी एक हजार ९८२ वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. वाहन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचा पार्श्वभूमीवर वाहन चोरट्यांना राेखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

शहरातील गर्दीची ठिकाणे, सोसायटीतून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शासकीय कार्यालये, रुग्णालयांच्या परिसरात लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीच्या आवारात लावलेल्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटना घडतात. शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरातून दुचाकी चोरून त्यांची परगावात, तसेच परराज्यांत विक्री केली जाते. वाहन चोरीचे गुन्हे आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण विचारात घेतल्यास चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
Two Bangladeshis arrested from pimpri
पिंपरी : दोन बांगलादेशींना अटक; आत्तापर्यंत किती घुसखोर बांगलादेशींवर कारवाई?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
2 women marry each other
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

वाहन चोरीला गेल्यानंतर पुन्हा सापडत नाही. शहरातील वेगवेगळ्या भागांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरट्यांचा माग काढण्यास मदत होते. मात्र, वाहन चोरल्यानंतर चोरटे वाहन क्रमाकांची पाटी बदलतात. चॅसीवरील क्रमांक बदलतात. त्यामुळे वाहन चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध घेणे कठीण होते. वाहन चोरीची तक्रार दिल्यानंतर ते परत मिळत नाही.

पुणे शहरात नोकरी-व्यवसाय, शिक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिक स्थायिक झाले आहेत. कर्जावर घेतलेले वाहन चोरीस गेल्यानंतर त्याची चांगलीच झळ सोसावी लागते. वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात येतो. गुन्हे शाखेकडून वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी पथकही तयार करण्यात आले आहे. मात्र, वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी आखलेली योजना कागदावरच असून, वाहन चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे. वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे उपनगरांत घडतात.

पुणे शहरातून गेल्या पाच वर्षांत आठ हजार ३७६ वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील सर्वाधिक दुचाकी आहेत. हप्त्यावर घेतलेली दुचाकी डोळ्यांदेखत चोरीला जात असल्याने सामान्य हवालदिल आहेत. वाहन चोरीला गेल्यानंतर त्याचे हप्ते तर भरावे लागतात. बँका, वित्तीय संस्थांना वाहन चोरीची सबब सांगता येत नाही. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण नगण्य आहे. वाहन चोरीला गेले, की ते परत मिळेल याची शाश्वती नसते. पुण्यातून चोरलेली दुचाकी बनावट कागदपत्रे वापरून परराज्यांत किंवा ग्रामीण भागात विकली जाते. काही चोरटे दुचाकी भंगार माल खरेदी-विक्री करणाऱ्यांना विक्री करतात. भंगारात कवडीमोल भावात दुचाकीची विक्री केली जाते.

पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित (एआय) २८०० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकारचे कॅमेरे बसविल्यास गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात वाढ होईल, असे सांगितले. या कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सराईत कॅमेऱ्यात टिपला गेल्यास त्वरित त्याची माहिती उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या कॅमेऱ्यात टिपल्या जाणाऱ्या संशयिताची छबी स्पष्ट दिसेल, तसेच त्याची माहिती मिळण्यास मदत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले कॅमेरे शहरात कार्यान्वित हाेण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. अशा प्रकारचे कॅमेरे बसविल्यास गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढीस लागेल, तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही वाढेल, अशी अपेक्षा करणे योग्य ठरेल.

वाहन चोरीचे पाच वर्षांतील गुन्हे

वर्ष            चोरीला गेलेल्या वाहनांची संख्या

२०२०             ९७५

२०२१            १५२९

२०२२                               १९०१

२०२३                               १९८९

२०२४                               १९८२

rahul.khaladkar@expressindia.com

Story img Loader