पुणे : राज्याच्या बहुतेक भागात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण हळूहळू कमी होऊन, शनिवारी, दोन डिसेंबरपासून राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून येणारी वाऱ्याची द्रोणीय रेषा उत्तर केरळ ते उत्तर मध्य महाराष्ट्रावर आहे, तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्याच्या उत्तर भागावर दिसून येत आहे. ईशान्य अरबी समुद्र आणि लगतच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय बंगालच्या खाडीत अतीतीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याचे शनिवार, दोन डिंसेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मोझांबिककडून भारताची ‘तूरकोंडी’… दरात तेजी राहणार

या सर्व वातावरणीय प्रणालींचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शनिवार, दोन डिसेंबरपासून ढगाळ हवामान कमी होऊन राज्यात थंडी जाणवू लागेल. पश्चिमेकडील थंड वाऱ्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी लवकर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद १४.६ अंश सेल्सिअस इतकी महाबळेश्वर येथे झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cold weather is likely to increase in the state from saturday december 2 pune print news dbj 20 css