पुणे : मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची आरोपींशी एका परिचितामार्फत गेल्या वर्षी जुलै महिन्यात ओळख झाली होती. व्यावसायिकाच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश हवा होता. आरोपींनी मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. प्रवेश न मिळाल्याने त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.