पुणे : राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर शहर काँग्रेसलाही जाग आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात आता दर सोमवारी साप्ताहिक बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (१० जुलै) पहिली बैठक होणार आहे.
हेही वाचा… डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
हेही वाचा… पुणे शहर राष्ट्रवादीत पडली संघर्षाची ठिणगी, आता होणार फक्त वादावादी!
दर सोमवारी होणाऱ्या या बैठकीस आजी-माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी आणि प्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक, ब्लाॅक अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महिला, युवक आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.