पुणे : काँग्रेसचे निष्ठावंत, माजी उपमहापौर आबा बागुल विधानपरिषदेसाठी आग्रही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विधानपरिषदेत वर्णी लागावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठीच बागुल यांची भाजपबरोबरची जवळीक वाढत आहे. विधानपरिषद देण्याचा शब्द दिल्यानंतरच बागुल यांचा भाजपमधील प्रवेशाबाबतचा निर्णय होणार आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सोमवारी भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली होती. त्यामुळे बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्यापही त्यांनी त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र या भेटीवरून तर्क-वितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागुल यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनी विधानपरिषदेची मागणी भाजप नेतृत्वाकडे केल्याचे समजते.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बागुल यांना पर्वती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्यांनी विधानपरिषदेसाठीचा आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल, त्यानंतर बदलणारी राजकीय समीकरणे, त्यानंतर पुढील वर्षी होणारी महापालिकेची निवडणूक यावर त्यांची पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाणार आहे.

Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
Bunty Shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news
नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Shoe necklace to BJP MLA Krishna Gajbe image due to Zendepar iron mine issue
भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला
BJP advertisement in major dailies featured slogan Ek Hai To Seif Hain with caps
भाजपच्या जाहिरातीत सर्व जातींच्या टोप्या…एक टोपी मात्र मुद्दाम…

हेही वाचा : पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा

‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर भेट झाली आहे. मात्र त्याबाबतचा तपशील लगेच उघड करता येणार नाही. जो निर्णय घेतला जाईल, तो सर्वांबरोबर चर्चा करून आणि विश्वासात घेऊन घेतला जाईल,’ असे बागुल यांनी सांगितले. मात्र भाजप नेतृत्वाने त्यांना विधानपरिषदेचा शब्द दिला नसल्याचे भाजपमधील सुत्रांकडून सांगण्यात आले. तर योग्य वेळी योग्य पुनर्वसन केले जाील, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतल्याचा दावा बागुल समर्थकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास बागुल इच्छुक होते. मात्र रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बागुल यांनी नाराजी व्यक्त केली होती. बागुल यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसकडून पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती. काँग्रेसचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता असूनही निष्ठावंताचा सन्मान राखला जात नाही. काँग्रेस भवनात आंदोलन केल्यानंतरही कोणी पदाधिकारी भेटण्यास आले नाहीत, असा आक्षेप बागुल यांनी नोंदविला होता. बागुल यांची भाजपबरोबर जवळीक वाढत असल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात बागुल महायुतीच्या प्रचारात छुप्या पद्धतीने सक्रिय असतील, अशी चर्चाही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.