पुणे : काँग्रेसचे निष्ठावंत, माजी उपमहापौर आबा बागुल विधानपरिषदेसाठी आग्रही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विधानपरिषदेत वर्णी लागावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठीच बागुल यांची भाजपबरोबरची जवळीक वाढत आहे. विधानपरिषद देण्याचा शब्द दिल्यानंतरच बागुल यांचा भाजपमधील प्रवेशाबाबतचा निर्णय होणार आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सोमवारी भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली होती. त्यामुळे बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्यापही त्यांनी त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र या भेटीवरून तर्क-वितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागुल यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनी विधानपरिषदेची मागणी भाजप नेतृत्वाकडे केल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा