पुण्यातील बॉम्बस्फोट आणि बिहारमधील बोधगया परिसरात आज रविवार पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट प्रकरण जोडले गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या सय्यद, इरफान, असद व इमरान या चौघांचीही याबाबतीत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार आज झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये या चौघांच्या साथीदारांचा समावेश आहे का? याचा शोध तपास यंत्रणा घेणार आहेत.
बिहारमधील स्फोटानंतर महाराष्ट्रातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धार्मिक स्थळांवरील सुरक्षा वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. बोधगया परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. तसेच घटनास्थळावरून दोन जीवंत बॉम्ब निकामी करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. बॉम्बस्फोटामुळे मंदिराचे कोणत्याही प्रकारचा नुकसान झालेले नाही. मात्र, बोधीवृक्षाजवळही स्फोट झाल्याने वृक्षाला हानी झाली आहे. तर जखमी झालेल्या पाच जणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
बिहारमधील स्फोटाचे पुणे कनेक्शन!
पुण्यातील बॉम्बस्फोट आणि बिहारमधील बोधगया परिसरात आज रविवार पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट प्रकरण जोडले गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या सय्यद, इरफान,
First published on: 07-07-2013 at 04:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune connection with bodhgaya bomb blast