शाळेतील सहकाऱ्यांनी तयार केलेल्या समुहावर स्टेटस ठेवण्याच्या वादातून तिघांनी एका युवकावर शस्त्राने वार केल्याची घटना पाषाण भागात घडली. या प्रकरणी तन्मय निम्हण (वय १९), करण मोरे (वय १९, दोघे रा. पाषाण) यांना अटक करण्यात आली. याबाबत आदित्य दशरथ औचरे (वय १८, रा. बालेवाडी) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य व आरोपी निम्हण, मोरे एकाच शाळेत शिक्षण घेत होते.

दोन वर्षांपूर्वी शाळेतील समुहावरील स्टेटस ठेवण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. आदित्य पाषाण परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला शिवीगाळ केल्याने आदित्यने जाब विचारला. तन्मय, करण यांनी त्याला मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार केला. त्या वेळी आदित्यबरोबर असलेल्या दोघा मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

Story img Loader