बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अॅक्ट (MOFA, मोफा) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलाय. २०१६ साली त्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला. मूळ प्रकरणामधील अर्जावर सर्वोच्च न्यायालयामध्ये २६ जुलै २०२२ रोजी सुनावणी होणं अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वकील अशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी डीएसकेंबरोबरच त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांची बाजू मांडली. सिंहगड पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी १३ ऑगस्ट २०१६ रोजी एफाआयआर दाखल करण्यात आली होता. या एफआयआरनुसार कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर जाणीवपूर्वकपणे डीएसके आणि त्यांच्या पत्नीने या ग्राहकांना घरांचा मालकी हक्क हस्तांतरित केला नाही. या प्रकरणी कुलकर्णी दांपत्याला ५ मार्च २०१९ रोजी अटक करण्यात आल्याचं खटल्यातील कागदपत्रांमध्ये म्हटलंय.
न्यायालयामध्ये न्या एस. के. दुगावकर यांनी मोफा कायद्याअंतर्गत कुलकर्णी यांना जामीन मंजूर केलाय. “या प्रकरणातील गुन्ह्यांसाठी कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनंतर त्यांना अचानक अटक करण्यात आली,” असं कुलकर्णींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मुख्य प्रकरणामधील एफआयआरसंदर्भातील अर्ज हा सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आला असून त्यावर २६ जुलै २०२२ रोजी सुनावणी होण्याची शक्यता श्रीवास्तव यांनी व्यक्त केलीय.
२ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद, पुतणी, जावई यांना अटक करण्यात आली. १७ फेब्रुवारी २०१८ पासून दीपक कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती पोलिसांच्या ताब्यात आहेत. २०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.
ईडीकडून चौकशी
या प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती. धायरी भागात त्यांच्या १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले. पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी भागात त्यांच्या मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या जागांची किंमत बाजारभावानुसार दोनशे ते तीनशे कोटी रूपये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली.