पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तीन रूपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात शिरसाठ यांना शिवाजीनगर न्यायालयातील दिवाणी न्यायधीश वाय. एल. मेश्राम यांनी समन्स बजावले आहे. 

हेही वाचा >>> शिरूर लोकसभा : अमोल कोल्हे विरुद्ध महेश लांडगे अशी लढत बघण्यास मिळणार? महेश लांडगे म्हणाले, “पक्षाने…”

आमदार संजय शिरसाठ यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर अंधारे यांनी ॲड. तौसीफ शेख, ॲड. क्रांती सहाने, ॲड. स्वप्नील गिरमे यांच्यामार्फत न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने आमदार शिरसाठ यांना समन्स बजावले आहे त्यांना १३ जुलै रोजी सकाळी दाखल दाव्यावर म्हणणे मांडणे, तसेच प्रतिवादासंदर्भातील सर्व कागदपत्रेही सादर करण्याचे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader