पुणे :ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर २०२३ रोजी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला. त्या आरोपीचा शोध सुरू आहे.त्याच दरम्यान ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती.त्या दोघांची आज पोलीस कोठडी संपत आल्याने, न्यायालयामध्ये हजर केल्यावर २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पण या सुनावणीवेळी महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार न्यायालयीन कामकाजावेळी गणवेशात हजर न झाल्याने गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्यावर नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने शिस्तभंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीला १५ दिवसांत पोलिस आयुक्तांमार्फत लेखी म्हणणे सादर करण्यात यावे असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा