पुणे : माहिती -तंत्रज्ञान पार्कमधील कामांचे ठेके मिळवण्यासाठी दबाब, धमकी दिल्यास खंडणीखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणीखोरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील खासगी कंपन्यांमधील स्वच्छता, मालाची वाहतूक करण्याचे कामााचा ठेका दिला जातो. ही कामे मिळवण्यासाठी उद्योजकांवर दबाव टाकला जातो. त्यांना धमकावले जाते. खराडी भागातील एका माहिती -तंत्रज्ञान कंपनीतील वाहतूक विषयक काम मिळवण्याठी धमकाविण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खासगी कंपनीतील कामाचा ठेका मिळवण्यासाठी दमबाजी केल्यास संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर

दरम्यान, खराडीतील बार्कलेज ग्लोबल सर्व्हिस सेंटर कंपनीतील वाहतूक विषयक कामाचा ठेका मिळवण्याठी धमकाविणाऱ्या दोघांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वैभव पाचारणे, सोमनाथ पठारे (दोघे रा. खराडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाचारणे, पठारे यांनी कंपनीत बेकायदा प्रवेश केला. आाम्ही स्थानिक आहोत. कंपनीतील वाहतूक विषयक कामे आम्हाला आम्हाला मिळाली पाहिजे, अशी धमकी दिली. काम न दिल्यास व्यवस्थापनाला त्रास देऊ, असे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक लिगाडे तपास करत आहेत.

हेही वाचा : “ईट का जबाब पत्थर से..”, आंदेकर खून प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांकडून गुंडांना इशारा

धमकावल्यास तक्रार करण्याचे आवाहन

माहिती-तंत्रज्ञान कंपनी व्यवस्थापनला धमकी दिल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहरातील माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. धमकाविल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cp amitesh kumar strict action against those who threat industrialists pune print news rbk 25 css