पुणे : मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने पुणे आणि दिल्लीतील गोदामात छापे टाकले. मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविणारा आरोपी पप्पू कुरेशी याने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातून १६ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम १५० मिलिग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पसार झालेला आरोपी मोहम्मद उर्फ पप्पू कुतूब कुरेशी (रा. केसनंद) याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशीने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि दिल्लीतील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दिल्ली आणि पुणे परिसरातील गोदामात छापे टाकून १६ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम १५० मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त केले.

हेही वाचा : “विजय शिवतारे अजितदादांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला इशारा

कुरेशी याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कुरेशीने अमली पदार्थांचा साठा अन्य ठिकाणी ठेवला का? यादृष्टीने तपास करायचा आहे. कुरेशी कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवित होता. त्याच्याकडे सांगली आणि दिल्लीत मेफेड्रोन वितरित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, असे सरकारी वकील ॲड. नीलीमा इथापे-यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती त्यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी कुरेशीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ केली.

हेही वाचा : “माढा, सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी”, राज्यातील कार्यकर्त्यांचा शरद पवारांना आग्रह

गोदामातील ड्रममध्ये मेफेड्रोन

दिल्लीतील गोदामात पोलिसांनी छापा टाकला. गोदामातील निळ्या रंगाच्या ड्रममध्ये मेफेड्रोन ठेवण्यात आले होते. निळे ड्रम दिल्लीत कसे पाठविले, कोणत्या वाहनाचा वापर केला? कुरेशी सराइत असून, त्याचे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्करांशी संबंध आहेत का? , यादृष्टीने तपास करायचा आहे. कुरेशी पसार झाल्यानंतर तो कोणाकडे वास्तव्यास होता. या काळात त्याने कोणाला अमली पदार्थांची विक्री केली का?, यादृष्टीने तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime branch raid in delhi in mephedrone smuggling case mephedrone of 16 lakh seized pune print news rbk 25 css