पुणे : स्वारगेट आणि हडपसर भागातील फुरसुंगीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गन्हा दाखल केला. स्वारगेट परिसरातील सारसनगर सोसायटीजवळ पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला (पथक दोन) मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली. याप्रकरणी आयाज अफगाण शेख (वय ४०), गणेश भाऊसाहेब भोसले (वय ४८, दोघे रा. मंगळवार पेठ) , वसीम फारुख शेख (वय ४०, रा. कांतीपुरम सोसायटी, कसबा पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Burger King Row : मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ नाव वापरण्यापासून रोखले, नेमकं काय आहे प्रकरण?

हडपसर भागतील फुरसुंगीत पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई केली. याप्रकरणी साईनाथ बाळासाहेब हरपळे (वय ३२, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), लखन तानाजी कासले (वय २६, रा. भेकराईनगर फुरसुंगी) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime branch raid in swargate hadapsar cases against eight persons pune print news rbk 25 css