पुणे : कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह सहायक निरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कल्याणीनगर भागात रविवारी (१९ मे) मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलगा अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाने १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करायचे, तसेच वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध लिहायचा, अशा अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दाद मागितली. दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बाल न्याय मंडळात त्याला पुन्हा हजर करण्यात आले. बाल न्याय मंडळाने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

हेही वाचा…पुणे अपघात प्रकरणात मुलाला वाचविण्याचे वडिलांकडून प्रयत्न; मुलगाच वाहन चालवीत असल्याचे पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. सामाजिक, तसेच राजकीय क्षेत्रातून दबाब वाढला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांकडून अपघात प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.