पिंपरी : तीन वर्षापूर्वी एका गुन्ह्यात दीराला पोलिसांकडे पकडून दिल्याच्या रागातून पतीसह दीर आणि जावेने महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला  आहे. हा धक्कादायक प्रकार मावळातील चांदखेड येथील डोंगरावर १६ जानेवारी रोजी घडला. पती आणि जावेला पोलिसांनी अटक केली असून दीर पसार झाला आहे. 

हेही वाचा >>> मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुण्यात जय्यत तयारी

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७, रा. पाचाणे, ता. मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२) आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण या दोघांना अटक केली आहे.  दीर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण (रा. पाचाणे,  मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खून झालेल्या महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. केळवडे, ता. भोर ) यांनी शिरगाव – परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> ‘श्रीराम’ पेढ्यांना रामभक्तांकडून मागणी

लोणीकंद येथील एका गुन्ह्यात सुनंदा हिने दीर गणेश याला पोलिसांकडे पकडून दिले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. याचा आरोपींना राग होता. त्या रागातून आरोपींनी सुनंदाचा खून करण्याचा कट रचला. १६ जानेवारी रोजी सकाळी सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चांदखेड येथील डोंगरावर जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सुनंदाचा फोन बंद असल्याने आणि ती घरी नाही नसल्याचे लक्षात आल्यावर सुनंदाच्या माहेरच्या लोकांनी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता हा प्रकार उघडकीस आला. फौजदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Story img Loader