पिंपरी : तीन वर्षापूर्वी एका गुन्ह्यात दीराला पोलिसांकडे पकडून दिल्याच्या रागातून पतीसह दीर आणि जावेने महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार मावळातील चांदखेड येथील डोंगरावर १६ जानेवारी रोजी घडला. पती आणि जावेला पोलिसांनी अटक केली असून दीर पसार झाला आहे.
हेही वाचा >>> मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुण्यात जय्यत तयारी
सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७, रा. पाचाणे, ता. मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२) आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण या दोघांना अटक केली आहे. दीर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण (रा. पाचाणे, मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खून झालेल्या महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. केळवडे, ता. भोर ) यांनी शिरगाव – परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> ‘श्रीराम’ पेढ्यांना रामभक्तांकडून मागणी
लोणीकंद येथील एका गुन्ह्यात सुनंदा हिने दीर गणेश याला पोलिसांकडे पकडून दिले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. याचा आरोपींना राग होता. त्या रागातून आरोपींनी सुनंदाचा खून करण्याचा कट रचला. १६ जानेवारी रोजी सकाळी सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चांदखेड येथील डोंगरावर जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सुनंदाचा फोन बंद असल्याने आणि ती घरी नाही नसल्याचे लक्षात आल्यावर सुनंदाच्या माहेरच्या लोकांनी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता हा प्रकार उघडकीस आला. फौजदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.