पुणे शहरातील कोंढवा भागातील कौसरबाग येथे पार्किंगच्या वादातून दोन तरुणांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे, तर घटनेत दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गणेश सुभाष राख पसरे वय ३२, रा. कोंढवा बुद्रुक आणि अफाक शेख ३० वर्ष रा. मिठा नगर, कोंढवा या दोघांमध्ये भांडण झाले; तर या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील कौसरबाग परिसरातील सना हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्त्यावर गणेश सुभाष राख पसरे याने त्याची कार पार्क केली होती, त्यावेळी तिथे आलेल्या अफाक शेख याच्यासोबत त्याचा वाद सुरू झाला.

काही मिनिटांत दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर त्या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली जात असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

Story img Loader