पुणे : सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत एका तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कर्वेनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम (ऑनलाइन टास्क) केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाला एक काम दिले. काम पूर्ण केल्यानंतर त्याला पैसेही दिले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला ऑनलाइन टास्कमध्ये आणखी पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी ४१ लाख ९४ हजार रुपये घेतले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाला परतावा दिला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

हेही वाचा – पुणे : पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याची हिंमत येते कोठून?

हेही वाचा – पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या

कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक

कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर भागातील एका महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवावे लागेल. त्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १५ लाख रुपये जमा केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी तपास करत आहेत.