दिवाळी सुरू आहे आणि सगळीकडे प्रकाशोत्सव सुरू आहे. पण, तो साजरा करताना, वेगवेगळ्या प्रश्नांच्या तिमिराची गडद छाया या शहराला वेटोळे घालून आवळू पाहते आहे, हे विसरून चालणार नाही. ज्या प्रकारे पुण्याचे स्वरूप बदलत चालले आहे आणि त्यामुळे गुन्हेगारी, असुरक्षितता या शहराला ज्या पद्धतीने व्यापू पाहते आहे, ते लक्षात घेता निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या या दिवाळीच्या निमित्ताने या मुद्द्यांना उजाळा देणे औचित्याचे.

पुण्याबद्दल बोलताना एक गोष्ट मान्य करायला हवी, की सायकलींचे, पेन्शनरांचे आणि शिक्षणाचे माहेरघर असलेले सुसंस्कृत व सुरक्षित पुणे आता रस्त्यांवर न मावणाऱ्या वाहनांचे, बकालपणाचे आणि कशानेही, कधीही जीव जाऊ शकेल, असे असंस्कृत आणि असुरक्षित शहर होत आहे. बोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचारामुळे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याहून वाईट म्हणजे, या घटनेवर रात्री-अपरात्री निर्जन जागेवर जायची गरज काय, अशा टिप्पण्यांची कुजबूज होते आणि फिरायला गेलेल्या युगुलावरच या दुर्घटनेचे खापर फोडण्याचा प्रयत्न होतो. पण, मग अगदी तातडीच्या कामासाठी या भागातून रात्री-अपरात्री जायला लागले आणि त्यापैकी कोणावर असा प्रसंग गुदरला, तर त्या वेळी काय म्हणणार? मुळात आरोपी हे असे कृत्य कुठेही करू धजतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असाच आहे. शहरात कोणत्याही रस्त्यावरून रात्री उशिरा एकट्याने प्रवास करताना भीती वाटत नाही, अशी परिस्थिती याच शहरात अगदी अडीचेक दशकांपूर्वीपर्यंत होती, हे पुणेकरांच्या विस्मृतीत गेले की काय? पुण्याच्या याच लौकिकावर देशातील सर्वाधिक परदेशी आणि परप्रांतीय विद्यार्थी पुण्यात येत असत, अजूनही येतात. बोपदेव घाटातील घटनेसारख्या घटना पुण्याच्या या लौकिकालाच बट्टा लावणाऱ्या आहेत.

loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा…पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांचे ‘पुणे कनेक्शन’ हाही अलीकडचा चर्चेचा विषय. लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सदस्यांशी संधान असलेले गुंड पुण्यात आसरा घेऊन राहिले होते, असे यानिमित्ताने समोर आले. बिष्णोई टोळीचे गुंड पुण्यात असल्याची बाब आधीही एकदा उघडकीस आली होती. पण, मग त्या दिशेने तपास करून त्याची पाळेमुळे खणली गेली का, हा प्रश्न नव्या घटनेमुळे डोके वर काढतो. मुंबईप्रमाणे पुण्यातही आता सर्रास गँगवॉर होतात. अमुक टोळी, तमुक टोळी, अमक्या म्होरक्या, तमका भाई यांचा तर सुळसुळाट झाला आहे. त्यातील अल्पवयीनांचा सहभाग आणखी सुन्न करणारा. भर रस्त्यात कोयते नाचवून दहशत निर्माण करणे आणि गर्दीसमोर खून पाडणे हेच अलीकडे ‘शौर्य’ समजले जाते. अशांना सामोरे जायला भीती वाटणे स्वाभाविकच. गेल्या वर्षी सदाशिव पेठेत एका मुलीवर झालेल्या हल्ल्यावेळी दोन तरुणांनी धैर्य दाखवून हल्लेखोराला पकडणे त्यामुळेच अपवादात्मक आणि असामान्य. पण, याच शहरात चार दशकांपूर्वी मॉडेल कॉलनीतील युनियन बँकेवर दरोडा पडला, तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांशी प्राणपणाने लढा देऊन त्यांचा पाठलागही केला होता. हे दरोडेखोर खलिस्तानसमर्थक दहशतवादी असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. मुद्दा असा, की त्या वेळी एकाला साथ द्यायला दुसरा फार तत्परतेने पुढे येत होता. अलीकडच्या महानगरीय जाणिवांत ही साथ कमी मिळत असल्याचे पुण्यातही पाहायला मिळते. आणि हे फक्त दहशतीच्या घटनांना विरोध करण्याबाबत नाही, तर अपघात किंवा संकटसमयी मदत करण्याबाबतही जाणवते. सामान्य माणसाला असे का वाटायला लागले, याचाही कधी तरी विचार करायला हवा. चांगल्या मनाने मदत करायला जाऊन आपणच गोत्यात येणार नाही ना, ही भीती अनेकांना मदत करण्यापासून रोखते, हे यंत्रणनेही लक्षात घ्यायला हवे. दुसरीकडे, पोलिसांवर हात उगारण्याची सवयही अशीच घातक. पोलिसांवर कारवाई करताना सातत्याने वेगवेगळ्या घटकांचे दबाव असतील, तर पोलिसिंग कसे परिपूर्ण होईल? सामान्य माणसाला असुरक्षित वाटणे आणि पोलिसांनाही आपले हात बांधल्यासारखे वाटणे हे सुरक्षित शहराचे लक्षण नाही.

बिष्णोई टोळी असेल, किंवा त्या आधीही एकूणच अधोविश्वाबद्दल पुण्यातील तरुणाईचे वाढत चाललेले आकर्षण हाही एक खरे तर समाजवैज्ञानिकांच्या अभ्यासाचा विषय असायला हवा. प्रसिद्ध गीतकार, कवी, लेखक जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत खलनायकाबद्दलच्या आकर्षणाचे विश्लेषण करताना ‘शोले’मधील गब्बरसिंग या खलनायकाच्या लोकप्रियतेचे उदाहरण देऊन म्हटले होते, की कोणताही नियम, दरबंध न पाळता बेदरकार जगण्याचा मिळत असलेला पर्याय, हे गुन्हेगारी टोळ्यांकडे आकर्षित होण्याचे एक कारण आहे. कोणाची तरी हत्या करून, धमकावून सहज हाती मिळणारा पैसा आणि वर एखाद्या भागात निर्माण होणारी दहशत, याचे तरुण पिढीत जबरदस्त आकर्षण आहे. त्याला जशी प्रच्छन्न हिंसा दाखविणारी मनोरंजनाची माध्यमे जबाबदार आहेत, तसे नैतिकता गुंडाळून गबर झालेल्यांच्या संपन्नतेचे आजूबाजूला दिसणारे कवडसेही कारणीभूत आहेत. अशा ऐश्वर्यसंपन्नांच्या जवळ जाणे म्हणजे नियम वाकविण्याचे सामर्थ्य मिळवणे, हेही समीकरण रुढ होताना दिसते. पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर ज्या पद्धतीने नियम-कायदे वळविण्याचे प्रयत्न त्यातील ‘आहे रे’ वर्गाकडून झाले, तो याचाच आविष्कार. नीती, मूल्ये एका बाजूला आणि पैसा एका बाजूला, असे हे थेट द्वंद्व आहे.

हेही वाचा…दिवाळीतील टिकल्या वाजविण्याच्या पिस्तुलाचा धाक, बाह्यवळण मार्गावर दहशत माजविणारे दोघे जण ताब्यात

त्यातच, पुण्याची जी आडवीतिडवी अस्ताव्यस्त वाढ झाली आहे, त्याला नसलेले कुंपण आणि त्यामुळे निर्माण होत असलेली सामाजिक-आर्थिक दरी, हाही एक गंभीर प्रश्न. गेल्या २५ वर्षांत पुण्याच्या परिघावर म्हाळुंगे, मावळ, चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी ठिकाणी आलेल्या माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांतील बहुराष्ट्रीय कंपन्या यामुळे जो रोजगार निर्माण झाला, तो महागडे उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या वाट्याला अधिक आला. ज्या गावांतील जमिनींवर कंपन्यांचे हे इमले उभे राहिले, तेथील अनेकजण जमीन गेल्याने शेतीपासून आणि कौशल्य शिक्षण नसल्याने रोजगारापासून वंचित राहिले. भूसंपादनाच्या बदल्यात मिळालेला पैसा अनेकांनी व्यवस्थित गुंतविण्याऐवजी छानछोकीत उडवला. या कफल्लकतेतून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. रोजगाराबाबत भ्रमनिरास झालेल्या तरुण पिढीतील काही जण गुन्हेगारीच्या वाटेला गेले. सध्या असलेल्या प्रस्थापित टोळ्यांचे म्होरके यातूनच पुढे आलेले दिसतात.

अगदी ढोबळ मानाने पाहायचे, तर पुण्यात श्रीमंत, नवश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब अशी एक वर्गीय उतरंड तयार झालेली दिसते. श्रीमंत आणि गरीब वर्ग सोडले, तर उरलेले सर्व कधी काळी मध्यमवर्गीय या एकाच गटात होते. कोणत्याही शहराची संस्कृती सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय टिकवून ठेवतो, असे म्हटले जाते. पुण्यात या मध्यमवर्गाची अनेक छोट्या छोट्या गटांत झालेली विभागणी हा वर्ग एकसंध ठेवण्यातील मोठा अडथळा बनली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी वाड्यात एकत्र राहणारे एकाच आर्थिक स्तरातील होते आणि त्यामुळे दैनंदिन व्यवहारांत मोकळेपणा होता. आता एका इमारतीतही सर्व एकाच आर्थिक स्तरातील असतात, अशी स्थिती नाही. त्यातून प्रत्येकाचे विश्व स्वतंत्र झाल्याने संवादही हरवला आहे. साधे नोकऱ्यांचे उदाहरण घेऊ. एकीकडे सेवा क्षेत्र वाढत असताना त्यातील कौशल्य शिक्षण घेतलेल्यांची आर्थिक भरभराट झालेली दिसते. उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान. अडीचेक दशकापूर्वी अभियांत्रिकीची पदवी न घेता, केवळ मोजक्या संगणक शिक्षणावर या क्षेत्रात जाऊन आता स्थिरावलेले अनेकजण आहेत. हेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी घेणाऱ्यांबाबतही. पण, त्याच वेळी भरभराट झालेल्यांएवढीच गुणवत्ता असूनही केवळ कला, वाणिज्यसारखे पारंपरिक किंवा उपयोजितऐवजी मूलभूत विज्ञान अभ्यासक्रमांची वाट निवडून नोकरी-रोजगाराला लागलेले अनेक जण कमाईच्या स्तरावर त्यांच्यापेक्षा खूप खाली असलेले दिसतात. आणि, याही खाली आणखी एक स्तर असून, त्यांच्या या वरच्या दोन स्तरांत जाण्याच्या आकांक्षा जबरदस्त आहेत. एकाच वर्गात निर्माण झालेली ही बहुपेडी आर्थिक तफावत अनेक संघर्षांचे कारण असल्याचे जाणवते. त्यात रस्त्यावर वाहन पुढे जायला जागा न देण्यातून झालेल्या भांडणांसारख्या क्षुल्लक कारणांवरून हाणामारीपासून थेट हत्येपर्यंत पोचण्याचा एक मोठा कॅनव्हास दिसतो. या सगळ्या संघर्षांचे समाज माध्यमांतून होणारे चित्रण काही वेळा अत्यंत भडक, तर काही वेळेला दिशाभूल करणारे असले, तरी स्मार्ट फोन या आता गरज बनलेल्या आणि अक्षरश: घरोघरी किमान एक तरी असलेल्या साधनावर ते दिसत राहते. त्यातूनही गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचे दिसत आहे. समाज माध्यमांवर मैत्री होते, तसे शत्रुत्वही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेले दिसते. त्यातून पुन्हा वर्चस्वाचे संघर्ष उभे राहतात, जे वास्तवात अधिक गडद रूप धारण करतात. आपापल्या भागात कोयते नाचवून निर्माण केली जाणारी दहशत, त्यात सामील अल्पवयीन मुले हे त्याचेच पर्यवसान आहे.

हेही वाचा…आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?

खरे सांगायचे, तर पुण्याची क्षमता संपत चालली आहे आणि पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत होत आला आहे. नव्या बांधकाम प्रकल्पांना परवानग्या द्यायच्या, तर पाणी कोण पुरविणार येथपासूनचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आहेत. सांडपाणी, रस्तेदुरुस्ती, करआकारणी, आरोग्य यंत्रणा आदी व्यवस्थांचे व्यवस्थापनही जटील झाले आहे. विस्ताराला पुरेसा अवकाश मिळाला नाही, तर त्या विस्ताराची सूज होते. पुण्याला सध्या अशी सूज आली आहे. अंगावर गळू यावे, तशी विविध नागरी समस्यांची गळवे पुण्याच्या अंगांगावर ठुसठुसत आहेत. ती चिघळायच्या बेतात आहेत आणि ती फुटली, की त्यातून पसरणारी अराजकाची साथ आवरता येणार नाही, इतकी मोठी असणार आहे. म्हणूनच… दिवाळीत एक तरी पणती पुण्याच्या कधी काळच्या सुकीर्तीची आठवण ठेवणारी लावू या आणि ती तेवत राहील, याची काळजी घेऊ या…! siddharth.kelkar@expressindia.com

Story img Loader