पुणे : बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. टोळक्याने ५० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केल्याने रहिवाशाांमध्ये घबराट उडाली. अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री आलेल्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षांची दांडक्याने तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. टोळके तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडीत वैमनस्यातून सराइतावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. माधाव वाघाटे खून प्रकरणात बदला घेण्यासाठी जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या सराइतावर गोळीबार करण्यात आला होता.