वाकड पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तसेच वाईन शॉपचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नवनाथ बाबासो नरळे असं दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचे नाव असून मेहताब उर्फ आयाब शेख याने दोन साथीदारांसह वाईन शॉपचे शटर उचकटून रोख रक्कम घेऊन पसार झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘आरटीई’त जागा वाढल्या; पण शाळा घटल्या!

हेही वाचा – चिंचवडमध्ये आजपासून ‘पर्पल जल्लोष’ महोत्सव, महापालिकेचा उपक्रम, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी एक टीम तयार केली होती. त्यानुसार सराईत आरोपी नवनाथ बाबासो नरळे याला वाकडच्या कस्पटे वस्ती येथून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे आढळल. अधिक तपास केल्यानंतर त्याच्याकडे इतरही एकूण नऊ दुचाकी मिळाल्या आहेत. गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पाच लाख किमतीच्या नऊ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तसेच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन साथीदारांसह वाईन शॉपचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या मेहताब उर्फ आयाब शेख यालादेखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इतर दोन साथीदारांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. दोघांकडून दुचाकी चोरीचे दहा, घरफोडीचे तीन असे १३ गुन्हे उघडकीस झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune criminal arrested for stealing two wheeler for fun nine bikes seized wakad police action kjp 91 ssb