पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तिघांची ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार उंड्री भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती देऊन जाळ्यात ओढले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी ३६ लाख ५२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोंढवा भागातील आणखी एकाची १६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तिघांची ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2024 at 16:58 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSगुंतवणूकInvestmentफसवणूकFraudमराठी बातम्याMarathi NewsशेअरShareशेअर बाजारShare Market
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cyber criminals defrauded three persons for 87 lakh rupees with lure of stock market investment pune print news rbk 25 css